बालेवाडी :
श्री. संजय (बाप्पू) बाजीराव बालवडकर (अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट, बालेवाडी), पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर आणि माजी नगरसेवक अमोल भैय्या बालवडकर यांच्या वतीने सलग ३१ व्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त सर्व वारकरी, नागरिक आणि बंधू-भगिनींसाठी बालेवाडी ते पंढरपूर मोफत दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी एकूण १५ बसेस पंढरपूर दर्शनासाठी रवाना झाल्या. मोठ्या उत्साहात भक्तीभावाने ही यात्रा यशस्वी रित्या संपन्न झाली.
सकाळी आषाढी वारीच्या निमित्ताने ह.भ.प. शेखर जांभुळकर महाराज, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. संजय (बाप्पू) बाजीराव बालवडकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर आणि मा.नगरसेवक अमोल रतन बालवडकर यांच्या उपस्थितीत बालेवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून पंढरपूर यात्रेला निघालेल्या सर्व विठ्ठल भक्तांना ह.भ.प. वांजळे महाराज यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी “ज्ञानोबा माऊली तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” चा जयघोष करत विठ्ठलाचे नामस्मरण केले, ज्यामुळे मंदिर परिसर भक्तीमय झाला होता.
अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही यात्रा यशस्वीरीत्या पार पडली. वारकऱ्यांनी आणि नागरिकांनी विठू नामाचा गजर करत आणि भजने म्हणत यात्रेचा मनसोक्त आनंद लुटला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली बालवडकर परिवाराची ही अखंडित परंपरा आजही मोठ्या उत्साहात आणि जोमाने सुरू असल्याचे या यात्रेतून दिसून आले. संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि आनंददायी झाले होते.
More Stories
बाणेर येथे डॉक्टर डे निमित्त सौ. पुनम विधाते यांच्या पुढाकाराने महिला डॉक्टरांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न…
बाणेर येथील कोस्टा ब्लांका सोसायटीच्या समस्या सोडवण्यासाठी समीर चांदेरे यांची विशेष बैठक संपन्न..
बालेवाडीतील अटलांटिस सोसायटीच्या समस्यांवर शिवम बालवडकर यांची चर्चा..