बालेवाडी :
“आधार, आपली ओळख आपला अधिकार” या उपक्रमांतर्गत नुकतेच भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांच्या वतीने त्यांच्या भाजपा जनसेवा कार्यालय बालेवाडी येथे एका विशेष आधार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरामध्ये नागरिकांना नवीन आधार कार्ड नोंदणी, आधार कार्डमधील माहिती अद्ययावत करणे (अपडेट), तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे यासह विविध महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेता आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घेतल्याचे दिसून आले, ज्यामुळे आधार-संबंधित कामांसाठी त्यांना सोयीस्कर व्यासपीठ उपलब्ध झाले.
या शिबिरामुळे नागरिकांची आधारशी संबंधित अनेक कामे एकाच ठिकाणी पूर्ण झाली, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि कष्ट वाचले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ होते.



More Stories
योगीराज पतसंस्थेची आर्थिक झेप; ठेवी १७० कोटींवर, दिवाळी खर्च दुष्काळग्रस्तांसाठी वळविला!
औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजन उत्साहात संपन्न, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
*संगीताच्या सुरेल मैफलीने रसिक मंत्रमुग्ध; दिवाळी बोनस वितरणातून शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान, पेरीविंकल परिवारात उत्साह आणि स्नेहाचा जागर!*