July 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

मांगळागौर स्पर्धेचे आयोजन: नारीशक्तीचा उत्सव बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथील महिलांसाठी सौ पूनम विधाते यांचा स्तुत्य उपक्रम

बाणेर :

बाणेर, बालेवाडी, सुस, आणि म्हाळुंगे परिसरात महिलांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर कार्याध्यक्ष पूनम विशाल विधाते यांच्या वतीने वामा वुमेन्स क्लबच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षी ‘मंगळागौर स्पर्धा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नारीशक्तीचा उत्सव साजरा करणारा हा कार्यक्रम रविवार, २७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत माऊली गार्डन, बाणेर येथे होणार आहे.

 

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. तसेच, विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत:
* प्रथम पारितोषिक: ₹३१,०००/-
* द्वितीय पारितोषिक: ₹२१,०००/-
* तृतीय पारितोषिक: ₹११,०००/-
* उत्तेजनार्थ पारितोषिक: ₹५,१००/-
याशिवाय, श्रावण क्वीन, सर्वोत्तम वेशभूषा आणि सर्वोत्तम निवेदिका यांनाही विशेष पारितोषिके दिली जातील.

स्पर्धेचे नियम:
१. प्रत्येक संघात कमीत कमी ७ आणि जास्तीत जास्त १२ सदस्यांचा सहभाग असणे बंधनकारक आहे.
२. प्रत्येक सहभागी संघाला सादरीकरणासाठी ८ ते १० मिनिटांचा वेळ दिला जाईल.
३. आयोजकांनी निवडलेले मंगळागौरीचे गाणे पेन ड्राईव्हमध्ये आणणे आवश्यक आहे.
४. स्पर्धेचे नियम, नोंदणी फॉर्म आणि इतर माहितीसाठी न्यूझीलंड सिस्टम उपलब्ध असेल.
५. स्पर्धेचा प्रवेश विनामूल्य आहे.
६. पारंपरिक वेशभूषेतील सहभाग अनिवार्य आहे.
७. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
८. प्रत्येक सहभागी महिलेला एक बक्षीस दिले जाईल.
९. स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या व येणाऱ्या प्रत्येक महिलेला मेंदी काढण्याची सोय असेल.
१०. ज्या महिलांनी स्पर्धेत भाग घेतलेला नाही परंतु ज्यांना मंगळागौरी खेळण्याची इच्छा आहे, त्या महिलांसाठी तीन वाजता खेळण्याची संधी असेल.
११. स्पर्धेचा अंतिम वेळ (रिपोर्टिंग टाइम) दुपारी १२:०० असेल.

या कार्यक्रमाचे आयोजक सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्षा-राष्ट्रवादी महिला काँग्रेस, पुणे शहर आणि अध्यक्षा – वामा वुमेन्स क्लब) आहेत. या स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी, ९६६५७४४४०० या क्रमांकावर संपर्क साधावा.

हा कार्यक्रम महिलांना एकत्र येऊन आपली संस्कृती आणि परंपरा साजरी करण्याची एक उत्तम संधी देईल. वामा वुमेन्स क्लबच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

You may have missed