बालेवाडी :
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लहू बालवडकर सोशल वेल्फेअर संस्थेने वारकऱ्यांच्या सेवेसाठी तिसऱ्यांदा मोफत वैद्यकीय सेवा उपक्रमांतर्गत विशेष रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) वारी मार्गावर कार्यान्वित केली आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शुभहस्ते आज या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले.
या उपक्रमामागे एक हृदयस्पर्शी प्रेरणा आहे. लहू बालवडकर यांच्या आजी, कै. श्रीमती भिकाबाई शंकर बालवडकर, गेल्या २५ वर्षांपासून नित्यनेमाने आषाढी वारीत चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असत. त्यांच्या निष्ठेचा आणि भक्तीचा वारसा पुढे नेत, त्यांच्याच संकल्पनातून गेली तीन वर्षांपासून लहू बालवडकर सोशल वेल्फेअर संस्थेकडून वारी मार्गावर रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक पाठवण्यात येत आहे. यंदाही ही सेवा तेवढ्याच श्रद्धेने आणि अधिक जोमाने दिली जाणार आहे.
या प्रसंगी बोलताना, कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. लहू बालवडकर सोशल वेल्फेअरने आजींच्या प्रेरणेतून सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, हे महत्त्वाचे आहे.”
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या वारीमध्ये लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने पायी चालत जातात. अशा वेळी त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे खूप गरजेचं आहे. लहू बालवडकर आणि त्यांच्या टीमचे हे कार्य अभिनंदनास पात्र आहे.”
या उपक्रमांतर्गत, वारकरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे रुग्णवाहिका सेवापथक संपूर्ण वारी मार्गावर मोफत वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध करून देणार आहे. सर्व वारकरी मायमाउलींनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लहू गजानन बालवडकर (अध्यक्ष, कोथरूड विधानसभा – उत्तर मंडळ) यांनी केले आहे.
यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, सचिन पाषाणकर, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, सुभाष भोळ, मनोज दळवी, सुधीर अलकारी, श्रेयश जाधवर, अभय बागल, उमाताई गाडगीळ, अस्मिताताई करंदीकर, वैदहीताई बापट, मृणालताई गायकवाड, स्मृतीताई जैन, निकिताताई माताडे, मीनाताई पारगावकर, उज्वलाताई साबळे, कल्याणीताई टोकेकर, विजयाताई चांदुरकर, तसेच लहू बालवडकर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
More Stories
सुस येथील गुलाब तांदळे यांची महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघ पुणे जिल्हा ‘संघटक’ पदी नियुक्ती
बाणेर येथील महिलांना सौ. पूनम विधाते यांच्या माध्यमातून शिवण आणि आरी वर्क प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वाटप : आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक पाऊल!
बाणेर येथील सिमेंट-काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त; समीर चांदेरे यांनी दखल घेत केली अधिकाऱ्यांसोबत पाहणी..