बोपोडी :
संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज पुण्यातील बोपोडी येथे आगमन झाले. हजारो वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत आणि भक्तीत तल्लीन होऊन पालखीचे स्वागत केले. राहुलदादा बालवडकर सोशल फाउंडेशन आणि राजहंस विकास मंडळ, बोपोडी यांच्या वतीने यावेळी वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.
यावेळी ‘तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अनुभव घेत अनेकांनी मनोभावे पालखीचे दर्शन घेतले. राहुलदादा बालवडकर सोशल फाउंडेशन आणि राजहंस विकास मंडळ, बोपोडी यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी रेनकोट, तातडीच्या उपचारांसाठी प्रथमोपचार किट, तसेच अल्पोपहार आणि पाण्याची बाटली वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे, एसीपी अजय कदम, श्री दिलीप बोरकर, शशिकांत भाऊ बालवडकर, उद्योजक संजयदादा घुले पाटील, श्री सचिन भाऊ पालांडे, डॉ. प्रवीण बढे, श्री शुभम आप्पा वायदंडे, श्री विकास केदारी, श्री नितेश जगताप यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.



More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा