July 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर आणि महाळुंगे येथील सोसायट्यांसाठी सौ पूनम विधाते यांच्या वतीने नवीन मतदार नोंदणी शिबिर

बाणेर :

लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे यावे, या उद्देशाने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर कार्याध्यक्षा पूनम विशाल विधाते यांच्या वतीने बाणेर आणि महाळुंगे परिसरातील सोसायट्यांमध्ये नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, अनेक नवमतदारांनी आपली नोंदणी केली आहे. यामुळे लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण पर्वात त्यांचा सक्रिय सहभाग नोंदवला गेला आहे.

पूनम विशाल विधाते यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “आपला मताधिकार म्हणजे आपल्या भविष्याचा आधार आहे.” ज्या नागरिकांनी अद्याप मतदार म्हणून नोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून लोकशाही मजबूत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या शिबिराच्या माध्यमातून “माझं मत – माझा अधिकार” या संदेशावर भर देत, नागरिकांना मतदानाच्या महत्त्वाविषयी जागरूक करण्यात आले.