July 27, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे नागरिकांच्या समस्यांवर समीर चांदेरे यांची महत्त्वपूर्ण बैठक: त्वरित निराकरणाचे आश्वासन

बाणेर :

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मा. श्री. बाबुराव चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या उपस्थितीत बाणेर येथील अजिंक्य पार्क परिसरातील विविध सोसायट्यांमधील नागरिकांशी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. औदुंबर, अवंतिका, आशिष, वर्षा A व B, बनप्लस, मल्हार, मुग्धांक्षा, अप्रिकॉट, अश्वमेध आणि श्रीफळ या सोसायट्यांचे नागरिक या बैठकीला उपस्थित होते.

 

या बैठकीत स्थानिक नागरिकांनी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक अडचणी, बंद आणि अपुरे ड्रेनेज सिस्टीम, खडखडीत व उखडलेले रस्ते, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची आवश्यकता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची गंभीर दखल घेण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी तातडीने संपर्क साधण्यात आला असून, या सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन समीर चांदेरे यांनी यावेळी दिले.