July 30, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस शाखेतील पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल च्या शिक्षक गिर्यारोहकांची आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिंहगडावर स्वारी !!!

सूस :

आज शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व सांगण्यात आले त्याचप्रमाणे शिक्षकांनाही सिंहगडावर गिर्यारोहण करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी शिक्षकांसाठी एक आगळावेगळा उपक्रम आयोजित केला आणि सर्व शिक्षकांना गिर्यारोहण करण्यासाठी सिंहगड येथे जाण्यासाठी सज्ज केले. आज सकाळी प्रशालेतून सर्व शिक्षक सिंहगड ला गिर्यारोहण करण्यासाठी सकाळी साडेसात वाजता सज्ज झाले.

 

सिंहगडावर गेल्यानंतर त्या ठिकाणी खोदीव टाके ,गणेश टाके , दारू खाना ,टिळक बंगला ,छत्रपती राजाराम महाराज समाधी ,नरवीर तानाजी मालुसरे समाधी, अमृतेश्वर भैरव मंदिर ,कल्याण दरवाजा, देवटाके, झुंजार बुरुज, कलावंतीन बुरुज त्या ठिकाणची ऐतिहासिक माहिती जाणून घेतली. त्यानंतर सर्व शिक्षकांनी पिठले भाकरी, वांग्याचे भरीत, मटकी आणि कांदा भजी यांचे चविष्ट आणि रुचकर गडावरच भोजन केल्याने आज गिर्यारोहण केल्याचा आनंद आणखी द्विगुणीत झाला . अतिशय उत्साहाने सर्व शिक्षकांनी सिंहगड गिर्यारोहणामध्ये सहभाग घेतला होता. नेहमीच उत्साही असणाऱ्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका नेहमीच प्रत्येक इव्हेंटची चांगली भूमिका घेत असतात.

सिंहगड गिर्यारोहण करण्यासाठी या योगा दिनाचे संपूर्ण आयोजन हे कायम पाठिंबा असणारे शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर तसेच संचालिका सौ रेखा बांदल व शिवानी बांदल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अभ्यासपूर्ण नेतृत्वाने करण्यात आले होते.

तसेच पर्यवेक्षक स्मिता श्रीवास्तव,सचिन खोडके व नेहा माळवदे यांचे सहकार्य मोलाचे ठरले . सर्व शिक्षकवृंद या सर्वांची जिद्द व चिकाटी यांचा मिलाप व सहकार्य आणि उच्च विद्या विभूषित आणि अनुभवी शिक्षकवृंद यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग व प्रतिसाद या सर्वाची आजची ही सिंहगड स्वारी खरच यादगार ठरली. रोजच्या व्यस्त कामातून स्वतःसाठी वेळ काढून वर्षाच्या सुरवातीलाच योग दिनाचे औचित्य साधून गिर्यारोहण आणि एकत्र येऊन सर्वांचा सहवास असा एकत्रित मिलाप आज अनुभवायला मिळाला. तसेच या गिर्यारोहणाचा मनमुराद आनंद सर्व शिक्षकांनी घेतला.

आजच्या या योगदानाच्या दिवशीचे औचित्य साधून अशी सिंहगड स्वारी केल्याबद्दल आणि व्यस्त जीवनात एक अनोखी आगळीवेगळी स्मरणात्मक ट्रेक आयोजित केल्याबद्दल सर्व शिक्षकवृंदांनी मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित व व्यवस्थापन यांचे मनापासून आभार व्यक्त करून धन्यवाद दिले.