पौड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या *पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज*, पौड शाखेमध्ये आज शनिवार, दिनांक *२८फेब्रुवारी २०२६ रोजी जागतिक विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सी . व्ही. रमन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी *पेरीविंकल प्रशालेच्या संचालिका शिवानी बांदल मॅडम* आणि *मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम* उपस्थित होत्या. प्रशालेच्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका श्रेया गडदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.
ओळख करून दिली. शालेय विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. या विज्ञान प्रदर्शनात पवनचक्की, सौर ऊर्जा प्रकल्प, जलचक्र, जलशुद्धीकरण, ठिबक सिंचन, प्रदूषण, स्मार्ट सिटी या विषयाला अनुसरून उपक्रम सादर केले. तसेच या विज्ञान प्रदर्शनात कोळवण शाखेच्या विद्यार्थ्यांनी ही सहभाग घेतला .मानवी ज्ञानेंद्रिय, जलचक्र यांसारखे उपक्रम सादर केले. या कार्यक्रमास समस्त पालक वर्गाने भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती पिंगळे आणि अंजली जाधव या विद्यार्थिनींनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर आणि संचालिका रेखा बांदल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्याकरता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी