पिरंगुट :
पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित आकर्षक व नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान प्रदर्शन उद्घाटन व संशोधक सी. व्ही रमण यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व सांगणारी व प्रात्यक्षिके सादर केली. “विज्ञान हेच भविष्याचा पाया आहे” हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडला.
विज्ञान प्रदर्शनामध्ये सौरऊर्जा, वेगवेगळ्या प्रदूषणावर उपाय ,जलशुद्धीकरण, पर्यावरण संरक्षण, रोबोटिक्स, हरितगृह परिणाम, मानवी शरीररचना आदी विषयांवरील एकूण 453 प्रकल्प विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली मॉडेल्स व प्रयोग सादर करून विज्ञानातील जिज्ञासा व संशोधन वृत्ती दर्शवली
शाळेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल सर्व शाखा समन्वयक निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित मुळशी पंचायत समिती सदस्य मा.राहुल पवळे लाभले.त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करून “राष्ट्रीय विज्ञान दिन हा केवळ एक दिवस नसून विज्ञानाबद्दलची आवड आणि संशोधनाची वृत्ती जोपासण्याची प्रेरणा आहे.” तसेच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य आसावरी हांचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे तसेच सामवेद हाऊस चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवसर्जनाची भावना अधिक दृढ झाली.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी