July 16, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीत शिवम बालवडकर यांच्या वतीने चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सेवा उपक्रम संपन्न..

बालेवाडी :

भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर आणि सौ प्रियंका शिवम बालवडकर यांच्या वतीने बालेवाडी येथे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत रिक्षाचालकांसाठी सीएनजी कूपन, नागरिकांसाठी पावसाळी छत्र्या आणि सफाई कर्मचारी बांधवांसाठी छत्र्या व रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले.

 

या प्रसंगी मा. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमात श्री. दत्तात्रय उभे यांचा संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रभाकरआणा मोहोळ, अध्यक्ष लहूआणा बालवडकर, पुणे शहर सरचिटणीस गणेशजी कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, सचिन पाषाणकर, मनोज बालवडकर पाटील, मोरेश्वर बालवडकर, सुभाष भोळ, उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर, निकीता माथाडे, कल्याणीताई टोकेकर, स्मृती जैन, मृणाली गायकवाड, वैदेही बापट, उज्वला साबळे, अभयजी बागल आणि भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बाणेर-बालेवाडीतील रिक्षाचालक, सफाई कर्मचारी आणि नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, जो प्रेरणादायी असल्याचे आयोजकांनी नमूद केले. शिवम बालवडकर आणि त्यांच्या पत्नी प्रियंका यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजासाठी, सेवेसाठी आणि न्यायासाठी काम करणे हेच आपले ब्रीद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.