पाषाण :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान पेरिर्विकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यां नी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER ) मधील गणित कार्यशाळेतून जाणून घेतल्या विविध क्लुप्त्या …..
गणिताच्या विविध शाखांमधील मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांनी जाणून घेतले गणित कार्यशाळेचे उद्दिष्ट घेतले. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना काही ना काही नवीन ज्ञानात भर घालण्याचे कार्य पेरीविंकल स्कूल मध्ये होत असते यावर्षीही इयत्ता सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सूस शाखा आणि बावधान शाखे च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बावधान शाखेचे 30 विद्यार्थी व सुस शाखेचे 50 विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
पाय (π) दिनाचे औचित्य साधून IISER येथे एक आठवडा कार्यशाळा आयोजित केली आहे त्यानिमित्ताने आपल्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय प्रोफेसर मेनक पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले IISER च्या संशोधक विद्यार्थ्यांनी कार्यशाळा घेतली विद्यार्थ्यांना गणितीय प्रतिकृती केलेल्या दाखवल्या आणि त्यांचे मार्गदर्शनही केले गणित विभागाच्या अनिसा चोरवाडवाला मॅडम यांनी परिमिती आणि क्षेत्रफळाचे वरचे व्याख्याने दिली. सूत्र कशी तयार करायची तसेच त्यांचा वापर कसा करायचा हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.
पाय (π) हा एक गणितीय स्थिरांक आहे जो वर्तुळाच्या परिघाचा त्याच्या व्यासाशी गुणोत्तर दर्शवतो. त्याचा भागफल 3.14159 आहे, परंतु तो एक अपरिमेय संख्या आहे, म्हणजेच त्याचा दशांश विस्तार संपत नाही.गणितात पायचे महत्त्व फार आहे. वर्तुळाच्या गणनेत वर्तुळाचा परिघ, क्षेत्रफळ आणि आकारमान मोजण्यासाठी पाय वापरले जातात.भूमितीमध्ये*: त्रिकोण, चतुर्भुज आणि बहुभुज मोजण्यासाठी भूमितीमध्ये पाय वापरला जातो.*त्रिकोणमितीमध्ये* त्रिकोन, त्रिकोण मोजण्यासाठी वापरला जातो.*गणितात*: पायचा (π) वापर कार्ये, मर्यादा आणि पूर्णांक मोजण्यासाठी केला जातो.
पाय गणितात खूप महत्त्वाचा आहे आणि गणिताच्या अनेक क्षेत्रांमध्ये वापरला जाणारा एक मूलभूत स्थिरांक आहे.गणितीय कार्यशाळा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्नॅक्स देण्यात आले.
प्रशालेच्या मुख्याध्यापक सौ निर्मल पंडित विद्यार्थ्यांना नेहमी कृतीतून चर्चात्मक पद्धतीने अभ्यास कसा करायचा हे नेहमीच सांगत असतात. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नको, तर प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पंडित मॅडम या वेळोवेळीच मोलाची भूमिका बजावत असतात.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक मा श्री राजेंद्र बांदल सर , संचालिका रेखा बांदल, व शिवानी बांदल व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाने व नियोजनाने संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात व अत्यंत शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला. तसेच सौ. स्मिता श्रीवास्तव, सौ. वैशाली घाडगे, प्रफुल्लता झाडगावकर यांनी स्वतः विद्यार्थ्यांसमवेत IISER येथे हजर राहून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
More Stories
पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी सज्ज!
मेडीपॉइंट ते लक्ष्मी माता मंदिर रस्त्यावरील त्रासदायक झाडांच्या फांद्यांची लवकरच होणार छाटणी ! शिवम बालवडकर यांच्या प्रयत्नांना पालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद..
डॉ. नमिता कोहक यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने बाणेरमधील ज्येष्ठ नागरिक झाले मंत्रमुग्ध