May 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेरमध्ये ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचा उत्सव; मॅटवरील राज्यस्तरीय ‘बाणेर केसरी’ कुस्ती स्पर्धेत लाखांची बक्षिसे आणि गौतमी पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम!

बाणेर :

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बाणेर गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचा उत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि.३० एप्रिल रोजी श्री भैरवनाथ महाराजांची पालखी सोहळा होणार आहे त्याचप्रमाणे रात्री ९ वाजता गौतमी पाटील यांचा सीमा पार्क, धनकुडे फॉर्म हाउस जवळ, सावतामाळी मंदिरा समोर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

 

तसेच दि.१ मे रोजी सकाळी ९ वाजता बाणेर येथील कै.सोपानराव बाबुराव कटके विद्यालयातील मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने व पुणे शहर कुस्तीगीर संघटनेच्या सहकार्याने मॅटवरील बाणेर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते त्याचप्रमाणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, बाणेरचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तपकीर, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे .

या स्पर्धे करीता खेळाडूंचे वजन बुधवार दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत कै. सोपानराव बाबुराव कटके,मनपा शाळा, बाणेर येथे घेण्यात येणार आहे.

या स्पर्धे मध्ये खालील प्रमाणे गटवारी केली असून त्यांची बक्षिसे पुढील प्रमाणे देण्यात येणार आहेत.
खुला गट =
प्रथम क्रमांक – २,५०,०००/- द्वितीय क्रमांक – २,००,०००/- तृतीय क्रमांक – १,५०,०००/- चतुर्थ क्रमांक – १,००,०००/-
८६ किलो गट =
प्रथम क्रमांक – २,००,०००/-
द्वितीय क्रमांक – १,५०,०००/-
तृतीय क्रमांक – १,००,०००/-
चतुर्थ क्रमांक – ७५,०००/-
७९ किलो गट =
प्रथम क्रमांक – १,५०,०००/-
द्वितीय क्रमांक – १,००,०००/-
तृतीय क्रमांक – ७५,०००/-
चतुर्थ क्रमांक – ५०,०००/-
७४ किलो गट =
प्रथम क्रमांक – १,००,०००/-
द्वितीय क्रमांक – ७५,०००/-
तृतीय क्रमांक – ५०,०००/-
चतुर्थ क्रमांक – २५,०००/-
७० किलो गट =
प्रथम क्रमांक – ७५,०००/-
द्वितीय क्रमांक – ५०,०००/-
तृतीय क्रमांक – २५,०००/-
चतुर्थ क्रमांक – १५,०००/-
६६ किलो गट =
प्रथम क्रमांक – ५०,०००/-
द्वितीय क्रमांक – २५,०००/-
तृतीय क्रमांक – १५,०००/-
चतुर्थ क्रमांक – १०,०००/-
६१ किलो गट =
प्रथम क्रमांक – ४०,०००/-
द्वितीय क्रमांक – ३०,०००/-
तृतीय क्रमांक – २०,०००/-
चतुर्थ क्रमांक – १०,०००/-
५७ किलो गट =
प्रथम क्रमांक – ३०,०००/-
द्वितीय क्रमांक – २०,०००/-
तृतीय क्रमांक – १५,०००/-
चतुर्थ क्रमांक – १०,०००/-
५२ किलो गट =
प्रथम क्रमांक – २५,०००/-
द्वितीय क्रमांक – २०,०००/-
तृतीय क्रमांक – १५,०००/-
चतुर्थ क्रमांक – १०,०००/-
४८ किलो गट =
प्रथम क्रमांक – २०,०००/-
द्वितीय क्रमांक – १५,०००/-
तृतीय क्रमांक – १०,०००/-
चतुर्थ क्रमांक – ५,०००/-
४१ किलो गट =
प्रथम क्रमांक – १५,०००/-
द्वितीय क्रमांक – १२,०००/-
तृतीय क्रमांक – ९,०००/-
चतुर्थ क्रमांक – ५,०००/-
अशाप्रकारे गटवारी असून वरील प्रमाणे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

यावेळी महिला कुस्तीचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये कुमारी ज्ञानेश्वरी पायगुडे विरुद्ध कुमारी संजना दिसले आणि कुमारी सिद्धी ढमढेरे विरुद्ध कुमारी आर्पिता गोळे अशी या महिलांची कुस्तीचे सामने रंगणार आहेत .

या स्पर्धेतील बक्षीसास पात्र न ठरणाऱ्या सर्व पराभूत कुस्ती पैलवानांना बाणेरचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे, उद्योजक रामदास मुरकुटे, उद्योजक चंद्रकांत जाधव, माजी उपसरपंच सत्यवान विधाते, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, उद्योजक रामदास धनकुडे, उद्योजक खंडूजी मांडेकर यांच्याकडून मानधन दिले जाणार आहे.

त्याचप्रमाणे या बाणेर केसरी कुस्ती स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रात्रौ ८:३० वाजता मा.मुरलीधर अण्णा मोहोळ (खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार), मा .चंद्रकांत दादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.मेघाताई कुलकर्णी (खासदार – राज्यसभा), मा.चंद्रकांत मोकाटे (मा.आमदार कोथरूड विधानसभा मतदारसंघ), मा. चंद्रशेखर सावंत (पोलीस निरीक्षक – बाणेर पोलीस स्टेशन), मा. राजकुमार केंद्रे (पोलीस निरीक्षक – बाणेर), मा.मिनल पाटील( पोलीस निरीक्षक), मा.नवनाथ जगताप (वरिष्ठ पोलीस निरीक्षक – बाणेर पोलीस स्टेशन) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

या पत्रकार परिषदेकरीता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे, गुलाबराव तापकीर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, माणिक गांधीले, माजी सरपंच जंगल रणावरे , अर्जुन शिंदे, रामदास धनकुडे, मल्हारी सायकर, नासिर सय्यद, राजेंद्र कळमकर, जगन्नाथ धनकुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.