पाषाण :
स्त्री शिक्षणाचे जनक, प्रथम शिवजयंती साजरे करणारे आणि जाती-धर्माच्या अन्यायाविरुद्ध खंबीरपणे लढा देणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘फुले’ या चित्रपटाचा विशेष मोफत शो आयोजित करण्यात आला आहे.
युवाशक्ती सोशल फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत असून, विशेषतः महिलांसाठी या शो चे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्रपट पाहण्याची संधी राहुल थिएटर, छत्रपती शिवाजीनगर, पुणे येथे १ मे २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता मिळणार आहे.
महात्मा फुले यांनी समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या कार्यामुळेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाला उजाळा देण्यासाठी ‘फुले’ हा चित्रपट निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
या मोफत शो चा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी ९७६६१२१११२, ९८८१५६२८५९ किंवा ९८५०९३६८९६ या क्रमांकावर संपर्क साधून आपली तिकीट निश्चित करावी, असे आयोजकांनी कळवले आहे.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!