बाणेर :
समर्थ व्याख्यानमाला आणि कपिला अखिला क्लब हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता कपिला अखिला क्लब हाऊस, बाणेर येथे “सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास” या विषयावर डॉ. नमिता कोहक (मिसेस ग्लोबल युनायटेड एलिट लाइफ टाइम क्वीन २०१७) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दोन्ही क्लबचे सुमारे २५० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आणि त्यांनी डॉ. कोहक यांच्या प्रेरणादायी विचारांचा अनुभव घेतला.
नाशिकमधील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. नमिता कोहक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जर ध्येय निश्चित असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्या स्वतः कॅन्सरवर मात करून गेल्या दहा वर्षांपासून या आजारावर काम करत आहेत. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व सांगितले आणि आनंदी जीवन जगण्याचा संदेश दिला. डॉ. कोहक यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः कॅन्सरवर विजय मिळवून आतापर्यंत सुमारे १८०० कॅन्सरग्रस्त मुलांची काळजी घेतली आहे.
आज त्यांच्या नावावर ७२ आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांची नोंद आहे. डॉ. नमिता कोहक या खऱ्या अर्थाने आपले आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आपल्या प्रभावी विचारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि जीवनातील संकटांवर मात करण्याची जिद्द बाळगण्याचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सेवानिवृत्त अतिरिक्त कलेक्टर सौ. मंगल घोडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार सेवानिवृत्त एसीपी मा. अजय कदम यांनी मानले.
या कार्यक्रमाला कपिला अखिला सोसायटीचे चेअरमन दिनेश कोथावदे, रवींद्र मराठे, दिलीप बोरकर आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. डॉ. नमिता कोहक यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना नवी ऊर्जा मिळाली आणि त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याला सलाम केला.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!