पुणे:
मेडीपॉइंट ते लक्ष्मी माता मंदिर या रस्त्यावर वाढलेल्या झाडांच्या फांद्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि चालताना होणाऱ्या त्रासाची दखल घेत, भाजपा पुणे शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांनी तातडीने औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश धापकेकर यांच्याकडे झाडांची छाटणी करण्याची विनंती केली होती. प्रशासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या रस्त्यावरील वाहतुकीस आणि नागरिकांच्या ये-जासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे.
या संदर्भात बोलताना भाजपा पुणे शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवम बालवडकर म्हणाले, “मेडीपॉइंट ते लक्ष्मी माता मंदिर हा महत्त्वाचा रस्ता आहे. परंतु, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या. याबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे मी तातडीने महानगरपालिका प्रशासनाकडे याची दखल घेण्याची विनंती केली होती.” प्रशासनाने तात्काळ या विनंतीची दखल घेत लवकरच झाडांच्या फांद्या छाटण्याचे आश्वासन दिले आहे.
यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी प्रशासनाकडून उचलल्या जाणाऱ्या या पावलांचे नागरिकांनी स्वागत केले आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी