February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी सज्ज!

बावधन :

दि. २९ एप्रिल २०२५ रोजी पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे नवीन शैक्षणिक धोरण २०२० (NEP) या अनुषंगाने एक विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत पेरिविंकलच्या बावधन, सूस, पिरंगूट, पौड, कोळवण आणि माले या सर्व शाखांतील २०० हून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन मा. सौ. आसावरी हंचाटे, सौ. रेखा बांदल , शिवानी बांदल मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित, तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आले. सौ. आसावरी हंचाटे, ज्यांना २० वर्षांचा अनुभव असून त्यांनी विविध अभ्यासक्रम (CBSE, ICSE, महाराष्ट्र राज्य मंडळ) तयार केले आहेत, यांनी १ ली ते १० वी साठीच्या NEP मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट आणि प्रभावी रीतीने समजावून सांगितली.

श्री. दर्शन सर यांनी १ ली ते ६ वी साठीच्या ‘एड्युवेट’ प्रशिक्षणाची रचना सोप्या व प्रात्यक्षिक स्वरूपात समजावली.

कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवणारी शैक्षणिक प्रक्रिया, मातृभाषेचे शिक्षणातील महत्त्व, वयानुसार शैक्षणिक टप्पे,बहुभाषिक अध्यापनाचे फायदे, उपक्रमाधिष्ठित व प्रयोगशील शिक्षण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आदी महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले. प्रशिक्षणादरम्यान सर्व शाखांतील शिक्षकांनी विषय वाटप पत्रके व वार्षिक अभ्यासक्रमाचे नियोजन आगामी शैक्षणिक वर्षासाठी (२०२५-२६) केले.

कार्यक्रमाच्या शेवटी संचालिका सौ. रेखा बांदल यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करत शाळेच्या विकासातील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शिवानी बांदल मॅडम आणि मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनीही शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता व कृतीशील अध्यापन यावर भर देण्याचे आवाहन केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल व शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या नियोजनाने पर्यवेक्षिका प्रज्ञा जोशी, आणि शिरीन काझी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सांगता प्रश्नोत्तर सत्राने करण्यात आली.