सोमेश्वरवाडी :
नुकत्याच अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या रिजनल तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वरवाडी येथील युवा खेळाडू प्रणव सोमनाथ जाधव याने उत्कृष्ट प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रणवच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सचिन दळवी यांनी प्रणवचे अभिनंदन केले आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना भाजपा कोथरूड उत्तर मंडल सरचिटणीस सचिन दळवी म्हणाले, “प्रणवने आपल्या जिद्दी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. आपल्या भागातील मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि प्रणव त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्या या कामगिरीमुळे इतर मुलांनाही प्रेरणा मिळेल.”
या सत्काराच्या वेळी सचिन दळवी मित्र परिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रणवच्या या यशाबद्दल सोमेश्वरवाडी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले