May 30, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील श्री. खंडेराय प्रतिष्ठान मध्ये महाराष्ट्र दिन साजरा.

बालेवाडी :

गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी श्री .खंडेराय प्रतिष्ठान संस्थेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणपतराव बालवडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .श्री. म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत ,ध्वजगीत व राज्यगीताचे गायन केले. पर्यवेक्षक श्री. लोहोकरे एस.बी .यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. माजी विद्यार्थी पैलवान विराज रानवडे व MPSC परीक्षा उत्तीर्ण ओंकार कदम यांचा अध्यक्ष श्री.गणपतराव बालवडकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

सर्व विभागातील सर्व प्राचार्य व शिक्षक यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी योग्य प्रगती करत राहावी, असे सांगत प्राचार्य श्री. दत्तात्रय डफळ यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्राविण्य मिळवण्यासाठी सर्व शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत शिक्षक हा कामगार नसून तो शिक्षक ज्ञानार्जन करणारा असा मार्गदर्शक आहे , असे मत संस्थेचे सचिव डॉ. सागर दादा बालवडकर यांनी व्यक्त केले.

MPSC परीक्षा उत्तीर्ण ओंकार कदम यांनी आपल्या शाळेच्या आठवणी सांगत विद्यार्थ्यांनी कशी प्रगती करावी असेच मोलाचे मार्गदर्शन केले.

माणसाने ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी सतत प्रयत्न करावे असे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.गणपतराव बालवडकर यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. गणपतराव बालवडकर ,सचिव डॉ .सागर दादा बालवडकर , श्री किसनराव बालवडकर, पोलीस पाटील श्री अनंता कांबळे, दैनिक लोकमतचे वार्ताहर श्री गुणवंत जाधवर, श्री महादेव कदम तसेच सर्व विभागांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक श्री. लोहोकरे एस.बी.सर, सूत्रसंचालन सौ. घोरपडे ज्योती , आभार प्रदर्शन डॉ. किशोरी उभे यांनी केले.