May 21, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

महाळुंगे येथे भाजपा कोथरुड विधानसभा उत्तर मंडल आयोजित भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; २०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

महाळुंगे :

महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून मा. ना. चंद्रकांतदादा पाटील आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाळुंगे येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्हीटीपी ब्लू वॉटर सर्कल, महाळुंगे-नांदे रोड येथे हे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जवळपास २०० हून अधिक जणांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

शिबिरामध्ये रक्तातील सर्व घटक तपासणी, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण, रक्तातील साखरेची तपासणी, स्तन कर्करोग तपासणी, दंत चिकित्सा, नेत्र तपासणी आणि रक्तदाब तपासणी यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य चाचण्या मोफत करण्यात आल्या. यामुळे परिसरातील नागरिकांना त्यांच्या आरोग्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

उत्तर कोथरूडचे अध्यक्ष मा. श्री. लहू बालवडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. उत्तर कोथरूड युवा मोर्चाचे कार्यकर्ते या शिबिराच्या संयोजनात सक्रियपणे सहभागी झाले होते. युवती अध्यक्ष कु. जागृती विचारे आणि युवा मोर्चा कोथरूड उत्तरचे सरचिटणीस मा. उपसरपंच श्री. अनिकेत चांदेरे यांनी आयोजनाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली.

 

या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनात भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, सरचिटणीस सचिन दळवी, सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर, कल्याणी टोकेकर, हर्षदा थिटे, शिवम सुतार, काळुराम गायकवाड, श्रेयस जाधवर, सुनील पांडे, राजेश राठोड, अनिल कामठे, डॉ. आनंद जराड, प्राजक्ता देवस्थळी, विजया चांदूरकर, यांच्यासह अनेक मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतला.

शिबिराला मिळालेला नागरिकांचा प्रतिसाद पाहता, आयोजकांनी समाधान व्यक्त केले आणि यापुढेही असे आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतल्याबद्दल संयोजकांनी त्यांचे आभार मानले.