बालेवाडी :
बालेवाडी येथील कै.बाबुराव शेटजी बालवडकर महानगरपालिका शाळेत महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कु. ओंकार महादेव कदम याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतून महसूल सहाय्यकपदी निवड झाली त्याच्या शुभ हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या प्रांगणात त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, पोलीस पाटील आनंदा कांबळे, संदीप बालवडकर, नरेंद्र बालवडकर, किसन तात्या बालवडकर, चंद्रशेखर बालवडकर, महादेव कदम, मुख्याध्यापिका सुजाता वाघमारे, कल्पना बाबर, शिक्षिका शोभा घोरपडे व पवार मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पवार मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. उपस्थितानी ओंकार कदम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम