May 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

म्हाळुंगे येथे ड्रेनेज कामाचा शुभारंभ ! चांदेरे परिवाराच्या प्रयत्नामुळे नागरिकांची समस्या होणार दूर..

म्हाळुंगे :

म्हाळुंगे परिसरातील Fortune Equilife आणि Sarthi Skybay या सोसायट्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ड्रेनेज कामाचा आज (दिनांक) स्थानिक नागरिकांच्या शुभ हस्ते शुभारंभ झाला. पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या सक्रिय सहकार्याने हे महत्त्वपूर्ण काम मार्गी लागले आहे.

 

या उद्घाटन सोहळ्याला दोन्ही सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या आरोग्याची आणि परिसरातील स्वच्छतेची गरज लक्षात घेऊन या ड्रेनेज कामाची मागणी अनेक दिवसांपासून होती. मा. बाबुराव चांदेरे आणि समीर चांदेरे यांनी याबाबत पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळवून दिली.

“नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि या ड्रेनेज कामामुळे परिसरातील आरोग्य आणि स्वच्छता निश्चितच सुधारणार आहे.” या विकासकामासाठी सहकार्य करणाऱ्या सोसायटीतील रहिवाशांचे आणि स्थानिक नागरिकांचे आभार. “सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच आज या कामाचा शुभारंभ होत आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास जाईल.”
समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

ड्रेनेजचे हे काम पूर्ण झाल्यावर Fortune Equilife आणि Sarthi Skybay या सोसायट्यांमधील सांडपाण्याची योग्य व्यवस्था होणार असून, नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहेत. या विकासकामामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.