बालेवाडी :
जागतिक महिला दिनानिमित्त रमामाता महिला मंडळ, भीम नगर, बालेवाडी येथील महिलांना राहुल दादा बालवडकर यांच्या वतीने ध्वनी प्रणाली भेट देण्यात आली. तसेच महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना राहुलदादा बालवडकर म्हणाले, “महिला या समाजाचा आधार आहेत. त्यांच्या योगदानामुळेच समाज प्रगती करतो. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना सन्मानित करण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. रमामाता महिला मंडळाच्या महिलांनी समाजासाठी केलेल्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही छोटीशी भेट देण्यात आली आहे.”
या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर उपस्थित होते. महिलांनी राहुल बालवडकर यांच्या कार्याचे कौतुक केले आणि आभार मानले.
यावेळी माणिक तात्या गांधीले, संजय ताम्हाणे, आनंदा कांबळे (पोलीस पाटील), हर्षल तापकीर आणि अथर्व बालवडकर उपस्थित होते.
More Stories
बाणेर येथे गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित “पर्यावरणपूरक गणपती बाप्पा मूर्ती कार्यशाळा” उत्साहात संपन्न..
“बाप्पा मोरया! सर्जनशीलतेचा जयघोष” – पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गणेश मूर्ती वर्कशॉप
बालेवाडी येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून स्मार्ट मीटरच्या फायद्याबद्ल माहिती आणि पायाभूत सुविधांचे वेळेवर देखभाल करून वीजपुरवठा सुधारण्याचे आश्वासन