May 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

महिला दिनानिमित्त बालेवाडी येथे चैतन्य गायक कट्ट्याला ज्योती कळमकर यांच्या वतीने कराओके स्पीकर सिस्टीम भेट

बालेवाडी :

जागतिक महिला दिनानिमित्त बालेवाडी येथील चैतन्य गायक कट्ट्याला माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर यांच्याकडून कराओके स्पीकर सिस्टीम भेट देण्यात आली. तसेच, मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने सर्जिकल मेडिकल किट भेट देण्यात आले. संजय बालवडकर फार्म येथे झालेल्या या कार्यक्रमाला बालेवाडी भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

यावेळी बोलताना सौ. ज्योती गणेश कळमकर म्हणाल्या, “महिला दिनानिमित्त महिलांसाठी काहीतरी विशेष करण्याची माझी इच्छा होती. चैतन्य गायक कट्ट्याच्या माध्यमातून महिलांना त्यांच्यातील कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना कराओके स्पीकर सिस्टीम भेट देऊन त्यांच्या आनंदात भर घालण्याचा माझा प्रयत्न आहे. तसेच, महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्जिकल मेडिकल किट भेट दिले आहे.”

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी सौ. ज्योती गणेश कळमकर यांचे आभार मानले.