April 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील योगीराज पतसंस्थेच्या वतीने महिला कर्मचार्‍यांचा सन्मान…..

बाणेर :

योगीराज पतसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेतील महिला कर्मचार्‍यांचा व खातेदारांचा अक्षरा इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका ज्योती राठोड, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. तसेच महिला दिनानिमित्त महिला ठेवीदार व महिला खातेदार यांचाही सन्मान करण्यात आला.

 

संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्थेत 50% पेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत व संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. संस्थेत नेहमीच आम्ही महिलांना सन्मानाची वागणूक देत असतो परंतू महिला दिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मार्च महिन्यात 20 कोटी रुपये ठेव संकलन करण्याचा संकल्प आहे त्यापैकी 6 दिवसातच 5 कोटी रुपये संकलन झाले आहेत अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

ज्योती राठोड यांनी सांगितले की, भारत देशात राष्ट्रपती, पंतप्रधान पदावर महिलांची निवड करून त्यांना विशेष सन्मान दिला जातो याचा इतर देशांनी आदर्श घेतला पाहिजे. योगीराज पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा इतर संस्थानी आदर्श कायम महिलांना दिलेल्या सन्मानाचा आदर्श घ्यावा.

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक मुरकुटे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, संचालिका रंजना कोलते, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके तसेच सर्व कर्मचारी व खातेदार उपस्थित होते.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे यांनी आभार मानले.