May 1, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बावधन येथील पेरिविंकल स्कूल मध्ये महिलाराज : जागतिक महिला दिनानिमित्त श्री राजेंद्र बांदल यांचे प्रतिपादन

बावधन :

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली
तो जिजाऊचा शिवबा झाला,
ज्याला स्त्री ‘बहिण’ म्हणून कळली
तो मुक्ताई चा ज्ञानदेव झाला,
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली
तो राधेचा श्याम झाला,
ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली
तो सीतेचा राम झाला….

बावधन येथे येथील पेरिविंकल स्कूलमध्ये दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण जगभरात महिलांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि नवी पहाट उगवली.समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग मिळावा व त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून राज्यात ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो.

 

महिला दिनानिमित्ताने शाळेतील महिला शिक्षकांसाठी विविध करमणूक कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील काही शिक्षकांनी रॅम्प वॉक सादर केला तसेच काही शिक्षकांनी नृत्य करत महिला दिनाचा आनंद लुटला. महिला दिनाचे औचित्य साधून शाळेच्या संचालिका सौ. रेखा बांदल यांनी शाळेतील शिक्षकांना संबोधन पर मार्गदर्शन केले व शिक्षीकांसाठी उपदेशून कविता सादर केली. त्यांचे समाजातील स्थान व महत्त्व समजावून दिले. तसेच शाळेचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका शिवानी बांदल यांनी शिक्षिकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे संगीत शिक्षक अक्षय कबाडे यांनी गीत सादर केले. तसेच संगीत शिक्षक अक्षय सर, क्रीडा शिक्षक सुरज सर यांनी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांना शाळेकडून चवीष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, शिरीन काझी, प्रज्ञा जोशी यांनी पाहिले.

You may have missed