पिरंगुट :
पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पिरंगुट येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी स्त्रीशक्तीचा जागर घडवला आणि सशक्तीकरणाचा संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात स्नेहपूर्ण स्वागत व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर महिला दिनाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी प्रास्ताविक करण्यात आले.
प्राथमिक विभागातील विद्यार्थिनींनी आकर्षक फॅशन शो सादर करत आत्मविश्वासाचा जलवा दाखवला. इनया, आर्या ,सानवी ,सुप्रिया, आरोही ,यशस्वी ,वेदिका, आरोही, त्रिशा आणि जमीला या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भारतातील विविध क्षेत्रांमध्ये प्राधान्य प्राप्त केलेल्या प्रसिद्ध महिलांच्या भूमिका साकारल्या.माध्यमिक विभागाच्या मुलींनी नृत्यमधून महिलासशक्तीकरणाचे संदेश देत समाजातील स्त्रीभूमिकेचे दर्शन घडवले.
याशिवाय, विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले, ज्यामुळे त्यांना आत्मरक्षणाची प्रेरणा मिळाली. अनुष्का, श्रावणी, अन्वेषा, कार्तिकी, स्वरा आर्य हर्षदा आणि आर्य माध्यमिक विभागातल्या विद्यार्थ्यांनी taekewondo मार्फत महिला संरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक पद्धतीने सादरी करण करून दाखवले.शिक्षकांनी विविध वेशभाषा करून फॅशन शो च्या माध्यमातून सादरीकरण केले. शाळा संस्थापकांकडून शिक्षकांसाठी सुमधुर अशा भोजनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली.
या सोहळ्याला शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण कार्यक्रमातून स्त्रीसन्मान, आत्मरक्षण आणि सशक्तीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता ही व्होट ऑफ थॅंक्स ने करून करून समारंभाचा समारोप करण्यात आला . व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षिका पूनम पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुख इंदू पाटील , पल्लवी नारखेडे व सना इनामदार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा घाणेगावकर आणि संतोषी गुरदडे . प्रणव महाजन यांनी केले.
या शानदार सोहळ्याच्या निमित्ताने शाळेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल व मुख्याध्यापिका निर्मल पंडीत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि सर्वांच्या मेहनतीची प्रशंसा केली.
More Stories
बाणेर येथील योगीराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांच्या मातोश्रींचे निधन
बालेवाडीत हरवलेली तीन मुले शिवम बालवडकर यांच्या प्रयत्नाने एका तासात सापडली!
बालेवाडीच्या सी एम इंटरनॅशनल स्कूल ज्युनिअर कॉलेजचा बारावीत शतप्रतिशत निकाल!