बालेवाडी :
भारतीय पारंपारिक मार्शल आर्ट्स आणि राहुल दादा बालवडकर यांच्या संयुक्त विद्यमाने राहुल दादा बालवडकर जनसंपर्क कार्यालयात ७ दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी थाळी फेक आणि रंग भरणे स्पर्धेत विजयी झालेल्या मनपा शाळा बालेवाडी येथील सृष्टी सुरडकर या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला शशी भाऊ बालवडकर, राजकुमारजी मालू, गिरिधरजी राठी, प्रकाशजी बोकील आणि इतर सहकारी उपस्थित होते.
भारतीय पारंपारिक मार्शल आर्ट्सचे महत्त्व आणि त्याचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आणि त्यांना या कलाप्रकारांची आवड निर्माण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. हे ७ दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या पार पडले आणि विद्यार्थ्यांनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला.



More Stories
पेरिविंकलचा ‘यशदीप’ पुन्हा तेजाने उजळला; SSC बोर्डात घवघवीत यशाची परंपरा कायम!
पेरीविंकलच्या सुस शाखेत इ.12वी नंतर 10वीत देखील १००% निकालाच्या इतिहासाची पुनरावृत्ती!! पेरीविंकल च्या अवंतिकाने मारली बाजी!!
पेरीविंकल शाळेच्या पौड शाखेच्या पहिल्याच दहावी बॅचचा शंभर टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!!!!