May 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडी प्रभागातील सफाई कर्मचारी महिलांचा पुनम विधाते यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष सन्मान

बाणेर:

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बाणेर-बालेवाडी प्रभागातील सफाई कर्मचारी महिलांचा विशेष “सन्मान सोहळा” आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर कार्यध्यक्ष पूनम विधाते यांच्या वतीने घेण्यात आला.

 

यावेळी पूनम विधाते म्हणाल्या, “आई, बहीण, पत्नी, आजी अशा विविध भूमिका पार पाडत महिलाच समाज आणि देश घडवण्याचे कार्य करत असतात. त्यांच्या या अथक परिश्रमांचा सन्मान करण्यासाठी केवळ एक दिवस पुरेसा नसून वर्षातील ३६५ दिवस महिलांचा सन्मान व्हायला हवा.” त्यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

कार्यक्रमाला भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या खजिनदार सौ. वर्षा विधाते, सौ. योगिता सुधाकर धनकुडे तसेच स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमातून सफाई कर्मचारी महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.