May 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

स्त्रीशक्तीला सलाम! बालेवाडीतील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत भाजपा युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांनी साजरा केला महिला दिन

बालेवाडी :

महिलांच्या धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पणाला नमन करण्यासाठी आजचा महिला दिन भाजपा युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांनी बालेवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला. यावेळी त्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

आपल्या संरक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी अहोरात्र तत्पर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी केवळ कर्तव्यदक्ष अधिकारीच नाहीत, तर समाजातील प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणास्रोत देखील आहेत. त्यांचा त्याग, मेहनत आणि धाडस हे देशासाठी अभिमानास्पद आहे.
– शिवम बालवडकर (उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पुणे शहर)

या कार्यक्रमात बालेवाडी पोलीस ठाण्यातील अनेक महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या. त्यांनी शिवम बालवडकर यांचे आभार मानले.