May 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकलच्या बावधन शाखेत मराठी व विज्ञान दिनानिमित्त भारतीय संस्कृती व विज्ञानाचा मिलाप

बावधन :

पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथे दी.२८ फेब्रुवारी, शुक्रवार रोजी विज्ञान दिनानिमित्त व मराठी दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम सी. वी. रमन व विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम या कार्यक्रमातून करण्यात आले.

 

इयत्ता सातवी च्या विद्यार्थियनी “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ” मराठी गौरव गीत सादर करण्यात आले. मराठी भाषचे महत्व सांगण्यात आले. कुसुमाग्रज, बालकवी , सिंधुताई सपकाळ, रणजीत देसाई, शिवाजी सावंत आशा कवी व साहित्यिक विषयी माहिती सांगितली.विज्ञान दिवसाचे औचित्य साधून सी व्ही. रामन, न्यूटन, थॉमस, वसंत गोवारिकर अशा शास्त्रज्ञांची व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांनी सादर केली. मराठी संस्कृति परंपरा व वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा सुंदर मिलाप घडवणारे एक नाट्य सादर करण्यात आले.

आधुनिकतेबरोबरच परंपरागत साधनांचा वापर करून विज्ञान व परंपरा यांची अनोखी सांगड घालत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. संस्कृती व वारसा जपत विज्ञान हे कसे उपयुक्त आहे हे विद्यार्थ्यांनी एका नाटकांमधून दाखवून दिले. आजच्या युगातही संस्कृती व विज्ञान यांचा मेळ विद्यार्थ्यांनी घालून दिला. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी लहान मोठे विज्ञान प्रकल्प गट तयार करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विज्ञान विषय देण्यात आले होते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा संस्थेच्या तडफदार संचालिका शिवानी बांदल यांनी व्यक्त केली.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती दृढ करण्याचे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, शिरीन काझी, प्रज्ञा जोशी, वृषाली ब्रम्हे यांचे मार्गदर्शन लाभले.