बाणेर :
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाणेर गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा झाला यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी श्री भैरवनाथ यांचा पालखी सोहळा पार पडला आणि रात्री गौतमी पाटील यांचा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्याचप्रमाणे गुरुवार दि.१ मे रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या सहकार्याने श्री भैरवनाथ उत्सवानिमित्त बाणेर येथील कै. सोपानराव कटके विद्यालयातील कै. नारायण शंकर लोंढे क्रीडा नगरीमध्ये बाणेर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या मॅटवरील भव्य बाणेर केसरी कुस्ती स्पर्धेस सुरुवात झाली या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ रुस्तम ए हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप मुरकुटे, गुलाबराव तापकीर, ॲड.पांडुरंग थोरवे, ॲड.दिलीप शेलार, नंदकुमार धनकुडे,रोहिदास मुरकुटे,राजेंद्र मुरकुटे, विजय लोंढे, दत्तोबा काटे, पांडुरंग विधाते, भाऊसाहेब चाकणकर, अंकुश धनकुडे, भिकू शिंदे, अमर लोंढे,दशरथ कळमकर, लक्ष्मण जाधव, पाटील धनकुडे, जयसिंग चांदेरे,धोंडीबा लोखंडे, मल्हारी सायकर ,अशोक धनकुडे ,राजू शेडगे, पुरुषोत्तम पाडळे, विकास भेगडे, राम गायकवाड, सुदाम मुरकुटे, मधुकर धनकुडे व इतर बाणेर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या स्पर्धेमध्ये एकुण पुरुष विभागातून २५५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला तर महिलांमध्ये ४ खेळाडू सहभागी झाल्या होत्या .
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
४१ किलो गट =
प्रथम क्रमांक – सिद्धांत भांगे( लातूर)
द्वितीय क्रमांक – सोहम मते (पुणे)
तृतीय क्रमांक – साई शितोळे ( पुणे)
चतुर्थ क्रमांक – संग्राम नलावडे ( पुणे)
४८ किलो गट =
प्रथम क्रमांक – तुषार कडू (नाशिक)
द्वितीय क्रमांक – अवधूत बोडके (पुणे)
तृतीय क्रमांक – तीर्थ डकरे (कोल्हापूर)
चतुर्थ क्रमांक – कैवल्य रेणुसे (पुणे)
५२ किलो गट =
प्रथम क्रमांक – सुजित जाधव (पुणे)
द्वितीय क्रमांक – स्वजल दळवी (पिंपरी-चिंचवड)
तृतीय क्रमांक – विराज गोंधळे (आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल)
चतुर्थ क्रमांक – सत्यजित कांबळे (सह्याद्री)
५७ किलो गट =
प्रथम क्रमांक – विशाल शिळीमकर (पुणे)
द्वितीय क्रमांक – प्रशांत रूपनर (पुणे)
तृतीय क्रमांक – अमित कुलाळ (पुणे)
चतुर्थ क्रमांक – अजय निंबाळकर (पुणे)
६१ किलो गट =
प्रथम क्रमांक – अमोल वालगुडे (पुणे)
द्वितीय क्रमांक – पंकज पाटील (सांगली)
तृतीय क्रमांक – रमेश इंगवले (कोल्हापूर)
चतुर्थ क्रमांक – अमीन यादव
६६ किलो गट =
प्रथम क्रमांक – आबा अटकळे (सोलापूर)
द्वितीय क्रमांक – ज्योतिबा अटकळे (सोलापूर)
तृतीय क्रमांक – अजय कापडे (पुणे)
चतुर्थ क्रमांक – कृष्णा हरणावळ (पुणे)
७० किलो गट =
प्रथम क्रमांक – तुषार देशमुख
द्वितीय क्रमांक – शनिराज निंबाळकर
तृतीय क्रमांक – प्रथमेश रानगे
चतुर्थ क्रमांक – सुरज अस्वले
७४ किलो गट =
प्रथम क्रमांक – सौरभ पाटील (कोल्हापूर)
द्वितीय क्रमांक – सुमित कुमार बारस्कर (बीड)
तृतीय क्रमांक – विकी कऱ्हे (पुणे)
चतुर्थ क्रमांक – सोमनाथ गोरड (सोलापूर)
७९ किलो गट =
प्रथम क्रमांक – आदर्श पाटील (कोल्हापूर)
द्वितीय क्रमांक – अक्षय चव्हाण (पुणे)
तृतीय क्रमांक – शुभम मगर (सोलापूर)
चतुर्थ क्रमांक – पृथ्वीराज बोडके (कोल्हापूर)
८६ किलो गट =
प्रथम क्रमांक – मुतजीर सरनोबत (धाराशिव)
द्वितीय क्रमांक – विजय सुरडे (नाशिक)
तृतीय क्रमांक – कौतुक डफळे (कोल्हापूर)
चतुर्थ क्रमांक – नितीन चव्हाण (कोल्हापूर)
खुला गट =
प्रथम क्रमांक – हर्षवर्धन सदगीर (नाशिक)
द्वितीय क्रमांक – प्रमोद सूळ (सोलापूर)
तृतीय क्रमांक – अनिकेत मांगडे (पुणे)
चतुर्थ क्रमांक – चेतन रेपाळे (अहिल्यानगर)
महिला विभागामध्ये ज्ञानेश्वरी पायगुडे(पुणे)ह्या विजेत्या तर संजना दिसले(पुणे)उपविजेत्या ठरल्या तसेच सिद्धी ठमढेरे(पुणे)ह्या विजेत्या ठरल्या तर आर्पिता गोळे (भोर)ह्या उपविजेत्या ठरल्या.
ग्रामस्थांच्या वतीने या कुस्ती स्पर्धेमध्ये विजेते खेळाडू सहित पराभूत खेळाडूंना देखील मानधन व भेटवस्तू देण्यात आली होती, या स्पर्धेमध्ये सर्व गटातील खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात आली होती.
या स्पर्धेचा बक्षिस समारंभ स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अध्यक्ष दिलीप मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर,उद्योजक जीवन दादा कळमकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर चांदेरे, अर्जुन ननवरे, विशाल गांधीले, प्रकाश तापकीर,अवधूत लोखंडे, माऊली सायकर, भाऊसाहेब चाकणकर, पाटील धनकुडे, कैलास कदम, योगेश मुरकुटे, समीर लोंढे, विलास कदम, राम ढवळे,राजेंद्र मुरकुटे जंगल रणवरे, राजू लोंढे, युवराज कुदळे, संजय ताम्हाणे,संजय तापकीर, मुकिंद तापकीर, भानुदास मुरकुटे, प्रशांत धनकुडे, अमोल भोरे, नितीन चांदेरे, गणेश सुतार, पूजा कड – चांदेरे, महेंद्र धनकुडे, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
या स्पर्धेला राज्यसभा खासदार मेघाताई कुलकर्णी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी सदिच्छा भेट दिली.
श्री भैरवनाथ उत्सवाचे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, माणिक गांधीले,रामदास धनकुडे, विश्वनाथ पाटोळे,किरण चांदेरे,राजेंद्र कळमकर, सोमनाथ धनकुडे, संतोष तापकीर, नितीन शिंदे ,संतोष कळमकर, युवराज धनकुडे,शेखर सायकर, आदेश देडगे ,लोकेश गायके इत्यादी मंडळींनी उत्कृष्टपणे आयोजन व नियोजन केले होते.
More Stories
बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे आणि पाषाण परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनचा ‘मान्सून सेफ्टी ड्राईव्ह 2025’ उपक्रम..
औंध येथे सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न*
महाळुंगे आणि सुस परिसरातील नागरिकांच्या समस्यां सोडविण्यावर भर देणार आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचे ‘जनता दरबार’, मध्ये नागरिकांना आश्वासन…