May 4, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

“पेरिविंकल स्कूल मध्ये घडतायेत उद्याचे शास्त्रज्ञ.”

सूस :

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल आणि जूनियर कॉलेज सुस. आज विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी IISER येथे जाऊन विज्ञानाचे धडे घेतले. IISER या संस्थेमार्फत विज्ञान दिनानिमित्त पुण्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा सुद्धा समावेश होता आणि निवड करण्यात आली होती.आज विज्ञान दिनानिमित्त सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत विज्ञानाच्या विविध प्रयोगाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

 

यामध्ये 47 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता २४ फेब्रुवारीला या विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले होते आणि आणि या सर्वांमध्ये पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल सुस अग्रेसर होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या भाषणांनी झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापले मॉडेल्स प्रदर्शनामधील लोकांना समजावून सांगितले. यामध्ये विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण बाहेर येत होते. या मॉडेल्समध्ये सेंटर ऑफ ग्रविटी, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप, मॅग्नेटिक फ्लक्स, वर्किंग ऑफ सिम्पल मशीन, वर्किंग ऑफ टरबाइन यांसारख्या अनेक मॉडेल्स उपलब्ध होते. संपूर्ण दिवसभर विद्यार्थ्यांनी आलेल्या सर्व प्रदर्शन प्रेमींना आपल्या मॉडेल्स बद्दल माहिती सांगितली.

या सर्व कार्यक्रमातून पेरिविंकल स्कूलचे विद्यार्थी खात्रीशीरपणे भविष्यातील शास्त्रज्ञ होतील यात काही शंका नाही.तसेच संपूर्ण दिवसभर अनेक विषयांवर चर्चासत्रे भरवली होती डॉ.अरविंद गुप्ता (पद्मश्री) यांसारख्या अनेक शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना येऊन मार्गदर्शन केले व त्यांचे कौतुकही केले. *विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नको, तर प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे* हे उद्दिष्ट ठेवून मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित या वेळोवेळीच मोलाची भूमिका बजावत असतात.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका रेखा बांदल,शिवानी बांदल यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कार्यक्रम पार पडला. सौ. स्मिता श्रीवास्तव, सौ. वैशाली घाडगे, कृष्णा अंभुरे सर यांनी विद्यार्थीना मार्गदर्शन केले.