बालेवाडी :
शहरातील सुशिक्षित व होतकरू युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “भव्य नोकरी महोत्सव २०२५” चे आयोजन उद्या रविवार, २ मार्च २०२५ रोजी करण्यात आले आहे. हा उपक्रम युवा नेता शिवम बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला असून, ५० पेक्षा अधिक नामवंत कंपन्यांचा यात सहभाग असणार आहे.
या नोकरी महोत्सवात Manufacturing, Banking, Finance, Retail, BPO, KPO, Healthcare, Security, Hospitality, Real Estate, Automobile, Pharma, IT यांसारख्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पाचवी पासून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना (वय १८ ते ३० वर्षे) या संधीचा लाभ घेता येणार आहे.
नोकरी मेळावा रविवार, २ मार्च २०२५ रोजी शिवम बालवडकर जनसंपर्क कार्यालय, बालेवाडी रोड, पुणे येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पार पडेल.
“पुण्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणे हा माझा हेतू आहे. केवळ नोकरी मिळवून देणे नव्हे, तर योग्य कौशल्य असलेल्या तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार योग्य संधी मिळावी, यासाठी हा नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. युवा पिढी सक्षम झाली तर समाज आणि देशही सक्षम बनेल.” – शिवम बालवडकर(उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पुणे शहर)
नोंद: इच्छुकांनी नोकरी महोत्सवाला उपस्थित राहताना किमान ५ बायोडाटा/रेझ्युमे सोबत आणावेत.
नाव नोंदणीसाठी लिंक: https://maharashtrajobfair.com/shivambalwadkar/


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी