November 21, 2024

Samrajya Ladha

ओळख श्री ज्ञानेश्वरी व हरिपाठ उपक्रमाचे मुरकुटे विद्यालयात उद्घाटन

बाणेर :

अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानेश्वर बाळाजी मुरकुटे पाटील विद्यालयात ‘ओळख श्री ज्ञानेश्वर व हरिपाठ’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते सातवी साठी हरीपाठाचा अर्थ व इयत्ता आठवीसाठी श्री ज्ञानेश्वरीची ओळख याप्रमाणे हा उपक्रम शाळेत राबविला जाणार आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराजांचे श्री ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ हे बालमनाला तरुणांना संस्कारक्षम असल्यामुळे त्याचा प्रचार व प्रसार होण्यासाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार’ या परिवाराने हा संस्कारक्षम उपक्रम हाती घेतलेला आहे.

या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यकार्यकारणी सदस्य व ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव श्री अजित वडगावकर यांनी केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक मुरकुटे यांच्या पुढाकाराने शाळेत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे.

यावेळी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्यातर्फे शाळेला हरीपाठाचे अर्थ विवेचन असलेला पेन ड्राईव्ह, हरिपाठ व ज्ञानेश्वरी भेट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी ह भ प प्रवीण महाराज शेंडकर जेजुरीकर, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक तुकाराम माने, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे सचिव विश्वंभर पाटील, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे सेवक बाळकृष्ण मोरे, सुभाष महाराज पाटील, अंकुश बोबडे एसपी स्कूल, ह भ प बबनराव चाकणकर, ह भ प मुरलीधर मुळूक, अमित क्षीरसागर, माजी नगरसेविका रंजनाताई मुरकुटे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संगीता डेरे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गायकवाड यांनी केले.