November 21, 2024

Samrajya Ladha

स्वातंत्र्य दिनी उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन द्वारा सत्कार

बालेवाडी :

स्वातंत्र्य दिन सोहळ्यात, बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने बाणेर बालेवाडी परिसरातील उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल मिलिंद रानडे होते. तर सन्माननीय पाहुणे म्हणून भारतीय क्रिकेट संघात खेळलेले फास्ट बॉलर पांडुरंग साळगावकर होते.

पाहुण्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन फेडरेशनच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात व भविष्यातील वाटचालीसाठी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या गेल्या.

सत्कार करण्यात आलेले खेळाडू पुढीलप्रमाणे :

अशा पैलवान शिवराज अनिल बालवडकर – कुस्ती, मुकुंद सोळंकी- पर्वातारोहण, सक्षम रतन- ईस्पोर्ट फुटबॉल, कोणार्क इंचेकर – बॅडमिंटन, पलश रूपचंदानी-टेनिस, निकिता आगे -क्रिकेट, सावरी शिंदे – पॉवर लिफ्टिंग, श्रेयस्त मंडाला – नेमबाजी , श्वेता आवाड – तलवारबाजी, सिद्धांत मांडगे – स्केटिंग, जयराज भिरूड – कराटे, सुयोग तापकीर -आईस स्केटिंग, स्वराज भोंडवे – एअर पिस्तूल शूटिंग, तनिष्का लोणकर – रायफल शूटिंग या खेळाडूंना सन्मानित केले.

भारतीय क्रिकेट संघात खेळलेले फास्ट बॉलर पांडुरंग साळगावकर यांनी यातून प्रेरणा घेऊन अनेक खेळाडू तयार व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.