November 21, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथील साई सिलिकॉन व्हॅली सोसायटीत ड्रेनेज चोकअप असल्याने चार दिवसापासून पसरले सांडपाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात…

बालेवाडी :

बालेवाडी येथील साई सिलिकॉन व्हॅली सोसायटी मध्ये मागील मागील चार दिवसापासून या भागातील ड्रेनेज चोकअप झाल्यामुळे सांडपाणी शिरले असून जवळपास नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगर पालिकेचे कर्मचारी प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नाला यश न मिळाल्याने ही दुर्गंधी वाढत चालली असून ट्रान्सफॉर्मर, पिण्याची पाण्याची टाकी, सोसायटी गार्डन, क्लब हाऊस या ठिकाणी हे पाणी पसरत आहे. त्यामूळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

नागरिकांनी दिलेल्या माहिती नुसार साई सिलिकॉन व्हॅली लेन मधून जाणाऱ्या रस्त्यावरील ड्रेनेज लाईन चोकअप झाली आहे. सोसायटी जवळ असणारे स्मार्ट सिटी गार्डन यामध्ये असणारे चेंबर फुटपाथ खाली असल्याने ते काढण्यासाठी स्मार्ट सिटी ची परवानगी लागेल असे पीएमसी कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे चोकअप दूर करण्याचे काम खंडित झाले आहे. त्यामुळे सांडपाणी गेल्या चार दिवसापासून परिसरात पसरत आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये सदर पाणी मिसळले जात असल्याने सोसायटी पिण्याचे पाणी टँकरद्वारे विकत घेत आहे.

एफ रेसिडेन्सी आणि कुणाल अस्पायर पर्यंत ड्रेनेज लाईन चोकोप असल्याने परिस्थिती गंभीर झालेली आहे. शेजारील संस्कृती सोसायटी आणि इतर सोसायट्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती अशीच राहिली तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन फार मोठ्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागेल अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

त्यामुळे महापालिका प्रशासन यांनी त्वरित हालचाली करून सदरची समस्या त्वरित दूर करणे अत्यंत गरजेचे आहे.