November 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

घरकामगारांच्या सक्षमीकरणासाठी मोठं पाऊल – पूनम विधाते यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण नाव नोंदणी अभियानास सुरुवात

पुणे :

मा. उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ यांच्यावतीने पुणे शहरात घरकामगार महिलांसाठी नाव नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.

हा उपक्रम राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर व वामा वुमन्स क्लब, बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने, आणि सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस – पुणे शहर व अध्यक्ष, वामा वुमन्स क्लब) यांच्या सक्रीय पुढाकारातून राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा शुभारंभ आज मुंबई येथून मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भोर-राजगड-मुळशीचे लोकप्रिय आमदार मा. शंकरभाऊ मांडेकर, देवळालीच्या आमदार सौ. सरोज अहिरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. सुरज चव्हाण आणि आमदार मा. दिलीप सानंदा यांची उपस्थिती लाभली.

या नाव नोंदणी मोहिमेद्वारे घरकाम करणाऱ्या महिलांना त्यांच्या हक्कांची नोंद होणार असून, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. हे अभियान म्हणजे घरकामगार महिलांच्या सक्षमीकरणाकडे एक भक्कम पाऊल आहे.

या उपक्रमास मा. अजितदादा पवार यांनी खास शुभेच्छा दिल्या असून, त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभल्याचा मला मनस्वी आनंद व अभिमान आहे, असे पूनम विधाते यांनी नमूद केले. त्यांनी असेही म्हटले की, “दादांचे नेतृत्व हे सामाजिक कार्याला दिशा देणारे आहे. त्यांच्या प्रेरणेने आम्ही महिलांच्या हक्कांसाठी सदैव कार्यरत राहू.”