August 27, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुसगाव येथे धनश्री भोते यांच्या वतीने छत्री वाटप; माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते शुभारंभ, सामाजिक बांधिलकीचे दर्शन

सुसगाव, ९ जुलै २०२५:

भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुसगाव परिसरात सौ. धनश्री सुहास भोते यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या छत्री वाटप कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ भोर, राजगड, मुळशी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला.

 

याप्रसंगी बोलताना माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सुहास भोते आणि धनश्री भोते यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. “पावसाळ्याच्या दिवसांत छत्रीची गरज सर्वांनाच असते. अशा वेळी गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना मदत करणे हे अत्यंत स्तुत्य कार्य आहे. यातून त्यांची समाजात मिसळून काम करण्याची वृत्ती दिसून येते,” असे थोपटे म्हणाले. त्यांनी या उपक्रमासाठी आयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीचे युवा नेते गंगाराम मातेरे, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, शिवाजीराव बुचडे पाटील, सुसगावचे माजी उपसरपंच आणि भाजपचे युवा नेते सुहास भोते, माजी चेअरमन साहेबराव जाधव, माजी उपसरपंच राहुल जांभुळकर, विद्युत वितरण समिती सदस्य युवराज पायगुडे यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सुहास भोते यांनी, “समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. धनश्री भोते यांच्या संकल्पनेतून हा छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले,” असे सांगितले.