बालेवाडी :
जागतिक महिला दिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या वतीने बाणेर-बालेवाडी परिसरातील रस्ते साफसफाई करणाऱ्या महिला सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज परिश्रम घेणाऱ्या या महिलांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महिला कामगारांना साडी, चॉकलेट आणि गुलाबाचे फूल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत समाजातील अशा कष्टकरी घटकांच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.
दररोज शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महिला सफाई कामगार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सन्मानाबद्दल उपस्थित महिला कामगारांनी आनंद व्यक्त करत राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचे आभार मानले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी