October 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे आयोजित सभेत सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांचा सकारात्मक प्रतिसाद, लवकर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील…

बालेवाडी :

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या वतीने आयोजित सोसायट्यांच्या प्रतिनिधी सभेमध्ये औंध वार्ड आॕफिसचे प्रमुख श्री.गिरीश दापकेकर यांना आमंत्रित केले होते. त्यांचा सत्कार फेडरेशनचे उपाध्यक्ष ॲड.परशुराम तारे यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत श्रद्धा कामठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन फेडरेशनचे सचिव ॲड.एस.ओ.माशाळकर यांनी केले.

या सभेमध्ये उपस्थित सदस्यांनी बालेवाडीतील रस्ते, ड्रेनेज, पाणी, कचरा या विषयावर आपापल्या समस्या तोंडी व लिखीत स्वरुपात सादर केल्या. श्री.दापकेकर यांनी सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सभेला बालेवाडीतील अनेक नागरिक उपस्थित होते.

सभे नंतर श्री.दापकेकर यांच्या सोबत बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे पदाधिकारी ॲड.इंद्रजीत कुलकर्णी, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, शकील सलाटी, अमेय जगताप, दफेदार सिंग, आशिष कोटमकर या पदाधिकाऱ्यांनी बालेवाडीतील दसरा चौक ते कुणाल एस्पायरी खराब रस्ता, भवानी मार्केट ते एफ रेसिडेन्सी तसेच पुढे सफायर पार्क पर्यंतचा रस्ता व ड्रेनेज समस्या, साई चौकातील मनपाने रु.९३ लाख खर्च करुन बांधलेली पण वापर होत नसलेली भाजी मंडई, साई चौकातील कचरा विलगी करण सेंटर, लक्ष्मीमाता मंदिरा जवळील खराब रस्ता व खड्डे यांची पहाणी केली. तसेच बालेवाडी गावातील बौद्ध विहाराच्या इमारतीची गळती, त्या समोर पेव्हर ब्लाॕक बसवणे इत्यादी कामाची पाहणी करुन त्यांच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

सहा. आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या बालेवाडी भेटीबद्दल व प्रश्न समजावून घेतल्याबद्दल फेडरेशनचे उपाध्यक्ष एड. पी. डी. तारे यांनी त्यांचे व त्यांच्या टिमचे आभार मानले आहेत.

बालेवाडीतील लक्ष्मीमाता मंदिर ते कंम्पर्टझोन सोसायटी या २४ मीटर रोडचे गेल्या १३ वर्षापासुन काम चालु आहे तो लवकरात लवकर पुर्ण करावा अशी विनंती मोरेश्वर बालवडकर यांनी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना केली. दापकेकरांनी सागिंतले महापालिका लवकरच रोडचे टेंडर काढणार पुढील काही महिन्यात या रस्त्याचे काम सुरू होईल.

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने नागरिकांच्या समस्यां व त्याला महापालिका अधिकारी वर्गाने दिलेली उत्तरे यांची नोंद केली असून भविष्यात याचा पाठपुरावा बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन करणार असल्याचे चेअरमन रमेश रोकडे यांनी सांगितले आहे.

 

You may have missed