May 8, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सुस-म्हाळुंगे-सोमेश्वरवाडी परिसरातील नागरीकांसाठी खास “एका लग्नाची पुढची गोष्ट” या अतरंगी नाटकाची आमदार कॅबिनेट मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून धम्माल मेजवानी…

बाणेर :

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सुस-म्हाळुंगे-सोमेश्वरवाडी परिसरातील नागरीकांसाठी कोथरूड मतदारसंघाचे आमदार कॅबिनेट मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून व कोथरुड विधानसभा (उत्तर) मंडलाच्या संयोजनाने प्रसिद्ध अभिनेते प्रशांतजी दामले व कविता लाड यांचे “एका लग्नाची पुढची गोष्ट“ हे प्रसिद्ध नाटक पहिल्यांदाच या परिसरातील बंटारा भवन बाणेर येथे आयोजित केले होते.

 

यावेळी परिसरातील सुमारे १२५० नागरीकांनी या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित राहुन या धम्माल नाटकाचा आनंद घेतला. भाजपा ओबीसी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रल्हाद सायकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

यावेळी पुणे शहर भाजपा अध्यक्ष श्री.धिरजजी घाटे यांच्या उपस्थितीमध्ये या नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. याप्रसंगी कोथरुड मंडलामध्ये विविध सामाजिक उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या सर्वच सभासद, पदाधिकारी व पक्षातील कार्यकर्त्यांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात याबद्दल शहराध्यक्ष धिरजजी घाटे यांनी विशेष कौतुक केले.

याप्रसंगी परिसरातील नागरीकांसमवेत भारतीय जनता पार्टी पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरूड उत्तर अध्यक्ष सचिन पाषाणकर, दक्षिण मंडळ अध्यक्ष संदीप बुटाला, नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, विद्या बालवडकर, प्रकाश तात्या बालवडकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, गिरीश भेलके, सचिन दळवी, उमा गाडगीळ, मोरेश्वर बालवडकर, विवेक मेथा, अस्मिता करंदीकर, लक्ष्मण मेघावत, प्रवीण आमले, कल्याणी टोकेकर, निकिता मथडे, सुभाष भोळ आणि सर्वच पदाधिकारी उपस्थीत होते.