पुणे :
आज आम आदमी पार्टी तर्फे पक्षाचा अकरावा वर्धापन दिन आणि भारतीय संविधान दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला, पक्षातर्फे जनतेला आणि विविध स्तरातील लोकांना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आमंत्रण देण्यात आले होते, आम आदमी पार्टी तर्फ नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सकाळी 9.30 वाजता रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना खिचडी आणि बुंदी वाटप करण्यात आला, त्यानंतर आप च्या कार्यकर्त्यानी आणि पदाधिकाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
जनतेच्या सहभागाने निर्माण झालेल्या आणि जनतेचे कल्याण करणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’ चा 11 वा साजरा करण्यासाठी हुतात्मा स्मारक येथे शहीद दिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली, तसेच वर्धापन दिनाचे निमित्त साधून आम आदमी पार्टी नाशिकचा हेल्पलाइन नंबर मोब. 9256565003 सुद्धा जनसेवेसाठी जाहीर करण्यात आला, त्यानंतर दुपारी अल्पोउपहारचा कार्यक्रम घेण्यात आला.
ह्यावेळी संघटन मंत्री नविंदर अहलुवालिया, राज्य मिडिया प्रमूख चंदन पवार पदाधिकारी गिरीश उगले पाटील, योगेश कापसे, स्वप्निल घिया, गोसिया शेख हसन, नुतन कोरडे, अमित यादव, विकास पाटील, प्रदीप लोखंडे,दिपक सरोदे,अभिजीत गोसावी, अमर गांगुर्डे, गोरख मोहिते, बाळासाहेब बोडके, आशिष खंडिझोड,माजिद पठाण, पदमाकर अहिरे, रमेश पाटील, कलविंदर गरेवाल,सुमीत शर्मा, शकील शेख ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..