July 27, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

“महापुरूष हे कुठल्याही भुमीसाठी मर्यादीत रहात नाही- डाॅ बाबासाहेब आंबेडकर

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात ६७ वा महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात बुध्दवंदनेने झाली. उपप्राचार्य डाॅ रवींद्र क्षीरसागर-डाॅ महेंद्र वाघमारे यांनी ही वंदना केली.

 

या प्रसंगी बोलताना प्राचार्य डाॅ संजय खरात म्हणाले “महापुरूष हे कुठल्याही भुमीसाठी मर्यादीत रहात नाही तर महापुरूष हा जगभर पुजला जातो व शतकानुशतके यांचे विचार मार्गदर्शन करत राहतात. जर तुमच्यामधे जिद्द असेल तर शाहुमहाराजां सारखे हात मिळतात. डाॅ.बाबासाहेबांचे ज्ञान हे व्यापक होते.त्यांचा शब्दसंग्रह हा फार मोठा होता. राष्ट्रीयत्वाची भावना ही बाबासाहेबांनी ग्रंथामधे विषद केली. अँनालिशन आँफ का्स्ट या सारखे पुस्तक हे समस्या व त्याची उकल हे दोन्ही सांगतात.

डाॅ.बाबासाहेब उत्तम पत्रकार, राजकारणी, समाजकारणी होते. त्यांचे ज्ञान हे खुप व्यापक आहे.हिंदु कोड बिल, महिला, लेबर लाॅज या सारखे कायदे हे सर्व त्यांनी समाजासाठी आणले. त्यांचे सर्व आयुष्य हे समाजासाठी संघर्षात गेले.” असे डॉ. खरात यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रा प्रथमेश गुर्जर यांनी सुत्रसंचलन केले. ग्रंथपाल डाॅ संगीता ढमढेरे यांनी समन्वय केले. या कार्यक्रमाला तीनही शाखांच्या उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित यांनी अभिनंदन केले.