May 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुस पाषाण रोडवरील घनकचरा प्रकल्प नांदे गावात आणल्यास तीव्र विरोध, ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठराव…

नांदे :

पुणे (म.न.पा) ने सुस पाषाण रोडवरील घनकचरा प्रकल्प स्थलांतरित करण्यासाठी नांदे गावाच्या हद्दीतील गायरान जागेची निवड केली असून या भविष्यात होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले असून त्याकरिता ग्रामपंचायतीने बोलाविलेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठया संख्येन उपस्थित राहून सदर प्रकल्पास तीव्र विरोध व शासनाचा निषेध व्यक्त केला. आणि सर्वांनी एकत्र येवून जोरदार विरोध करण्याचा ठराव संमत केला.

 

ग्रामसभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रकल्पास विरोध करण्याचा सर्वांनी एकमताने ठराव मंजुर केला. यामध्ये नागरिकांचा व महिलांचा ऊत्सफुर्त प्रतिसाद मिळाला ग्रामस्थांनी एकजुटीने तीव्र विरोध करण्याचे ठरविले असून भविष्यात तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे : सरपंच निकिता रानवडे

कचरा प्रकल्प नांदे गावात आल्यास नागरीकांना भविष्यात होणाऱ्या त्रासाची जान असल्याने नांदे गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामसभेला फार मोठी गर्दी झाली होती. यामध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. गावातील सर्वपक्षीय नेतेमंडळी देखिल विरोध बाजूला ठेऊन एकत्र आली होती.