September 17, 2024

Samrajya Ladha

बावधन येथे रक्तदान शिबीर, मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद..

बावधन :

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रसेवा प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आणि मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरास परिसरातील नागरिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “सेवा आणि समर्पण” सांगितल्याप्रमाणे प्रत्येक उपक्रम याच धरतीवर घेण्याच्या दृष्टीने काल २२ जुलै २०२३ रोजी स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल बावधन येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. २३ जुलै २०२३ रोजी सर्वांसाठी रक्तदान शिबीर आणि मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे आणि नवनियुक्त भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड चे प्रेसिडेंट सुधीर बापट आणि कम्युनिटी डायरेक्टर अनिल कासोदेकर हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

तसेच या प्रसंगी नवनिर्वाचित पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांचे सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, मोदी @ 9 हे पुस्तक देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रमुख उपस्थिती असणारे भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.राजेशजी पांडे साहेब यांचेही स्वागत सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, मोदी @ 9 हे पुस्तक देऊन केले.