May 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे एसीपीची पत्नी व पुतण्याला गोळी घालून स्वतःला गोळी घालत आत्महत्या..

बाणेर :

बाणेर भागात 57 वर्षीय एसीपीने राहत्या घरी स्वतः गोळी झाडून आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी आणि पुतण्यालाही ठार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज 24 जुलै पहाटे 3.30 च्या सुमारास घडली आहे.

 

एसीपी भारत गायकवाड यांच्या बंगल्यावरच हा प्रकार घडला आहे. अद्याप यामागील कारण समजू शकलेले नाही. सध्या चतुशृंगी पोलिस स्टेशनचे कर्मचारी या घटनेचा तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड हे अमरावती मध्ये एसीपी म्हणून काम करत होते. सध्या ते पुण्यात आले होते. शनिवारी सुट्टीला आलेल्या भारत गायकवाड यांनी दुसर्‍याच दिवशी स्वतःसह घरातील 2 व्यक्तींचा जीव घेतला. पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) असे गोळी घातलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3.30 च्या सुमारास प्रथम गायकवाड यांनी पहिल्यांदा पत्नीच्या डोक्यात गोळी घातली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा आणि पुतण्या धावत आला. त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी गायकवाड यांनी पुतण्यावर गोळी झाडली जी त्याच्या छातीत लागली. त्यानंतर गायकवाड यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. तिघांचा देखील जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस करत आहे.