September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डी खेळाडू शंकरराव ऊर्फ दौलतराव ढमाले यांचे अल्पशा आजाराने निधन..

पुणे :

शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि पूना अमुचर्स संघाचे आधारवड शंकरराव ऊर्फ दौलतराव (आप्पा) शहाजीराव ढमाले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यविधी आज सोमवार दि.२४ जुलै दुपारी २.०० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ येथे होईल.

मूळचे मुळशी तालुक्यातील असणारे ढमाले सर यांनी कबड्डी क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळवला होता. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन मध्ये अनेक वर्षे त्यांनी अतिशय शिस्तबद्ध रित्या खजिनदार म्हणून काम पाहिले. एक चांगले मार्गदर्शक मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांना परिचित होते.

 

You may have missed