औंध :
औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी वाङमय मंडळा व स्नेहवर्धन प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सरीवर सरी…’ या काव्य मैफिलीचे आयोजन दि’. २२ जुलै, २०१३ रोजी केले होते.
स्नेहवर्धन प्रकाशनाच्या संपादिका डॉ.स्नेहल तावरे व हृदयन सोशल वेल फेअर च्या अध्यक्ष डॉ संगीता ढमढेरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
डॉ. स्नेहल तावरे म्हणाल्या कि वाड:मय मंडळ हे साहित्यिकांची मांदीयाळी असते आणि काव्यसुमनाने रसिकांची मने जिंकत असतात. म्हणून कवी आणि काव्यमैफिली ह्या माणसाला जगण्याची नवी ओढ देतात. तसेच काव्यमैफिल मनामनांत साठवून ठेवण्यासाठी तिचा कवितासंग्रह प्रकाशित करण्याची इच्छा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
हृदयम सोशल वेल्फेअर सोसायटीच्या, अध्यक्षा डॉ.संगीता ढमढेरे यांनीही कवितेचे समाजबांधणीमधील महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अरुण आंधळे यांनी केले. काव्यमैफिलीतील सहभागी कवींचे त्यांनी स्वागत केले आणि त्यांच्या ऋणातच राहण्याचा मनोदय व्यक्त केला .
महाविद्यालयाच्या ह्या काव्यमैफिलीत एकूण ३२ कवींनी त्यांच्या काव्यरचना सादर केल्या. यामध्ये दीपक करंदीकर, हेमलता गीते,मंजिरी भुजबळ , वैशाली भालेराव, रामचंद्र राऊत , सुनीता कुलकर्णी, डॉ सीमा गोसावी, सीताराम गोसावी, दीपक पवार, किशन उगले, पद्मिनी देशमुख, डॉ वैशाली कोटंबे, वैष्णवी, अनिता गुजर, मुग्धा कुंटे, करून शिंदे, अवि झोल, संगीत शेंडे, उन्मेष मोहितकर, हास्यकवी बंद जोशी आदी कवींनी कविता सादर केल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक डॉ.सविता पाटील यांनी केले. काव्यमैफिलीचे बहारदार सूत्रसंचालन मा.श्री दीपक कोठावळे यांनी तर उदघाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी केले.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…