बाणेर :
मुरकुटे गार्डन चौक आणि कळमकर चौक परिसरात होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी स्थानिक वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत या परिसराची पाहणी केली. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात समीर चांदेरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद डोंगरे आणि पोलीस हवालदार सागर बाबरे सहभागी झाले होते. वाहतूक कोंडीची नेमकी कारणे आणि त्यावर तात्पुरते तसेच कायमस्वरूपी उपाय काय असू शकतात, याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी मुरकुटे गार्डन चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी या चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी वाहतूक पोलिसांना करण्यात आली. यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!